बोअर झालेल्या शारापोवाने शेअर केला फोन नंबर आणि…


फोटो साभार युएसए टुडे
अमेरिकेत करोनाचा कहर कायम असला तरी टेनिस सेन्सेशन स्टार मारिया शारापोव्हा जेथे राहते त्या कॅलिफोर्नियात अजूनही लॉकडाऊन केले गेलेले नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून मारियाने स्वतःला घरात आयसोलेट करून घेतले आहे. पण साहजिकच घरात बसून ती बोअर होत आहे आणि बोअरडम घालविण्यासाठी तिने एक युक्ती केली आहे. मारियाने तिचा मोबाईल नंबर ट्विटरवर शेअर केला. याचा परिणाम असा झाला आहे की मारियाला आता क्षणाचीही उसंत मिळेनाशी झाली आहे.

शुक्रवारी मारियाने तिचा ३१०-५६४-७९८१ हा मोबाईल नंबर शेअर करून लिहिले होते, ‘ हॅपीचा आजचा अर्थ शारीरिक दूरत्व असाच आहे मात्र तुमच्याशी जोडले राहण्याचा प्लॅन बनविला आहे. माझा मोबाईल नंबर शेअर केला आहे, तुम्ही त्यावर प्रश्न विचारू शकता, हॅलो करू शकता किंवा एखादी चांगली रेसिपी दिलीत तर त्याचे स्वागत.’ मी तुमच्या प्रश्नांना उत्तरे देईन. पुढच्या दिवशीपासून मारियाकडे मेसेजचा अक्षरश पाऊस सुरु झळा. ४० तासात तिच्याकडे २२ लाख मेसेजेस आले असून मारियाला आता दिवस अपुरा पडू लागला आहे.

५ वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या या रशियन टेनिस खेळाडूंचे वास्तव्य अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे असून तिने नुकतीच टेनिस मधून निवृत्ती जाहीर केली होती.

Leave a Comment