व्हायरल; रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीच्या मागे लागला गेंडा

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन आहे. अशा स्थितीत माणसे घरात आहेत व प्राणी रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. जंगली प्राणी देखील रस्त्यावर अनेकदा आल्याचे दिसून आले आहे. नेपाळमधील गेंड्याचा रस्त्यावर फिरतानाचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे माहिती नाही. मात्र हा नेपाळच्या चितवन राष्ट्रीय उद्यानाच्या भागात चित्रित करण्यात आलेला आहे. या राष्ट्रीय उद्यानामध्ये गेंड्यांची संख्या मोठी आहे आणि मोठ्या संख्येने प्राणी जंगलातून बाहेर पडतात.

नेपाळमध्ये 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, त्यामुळे सर्व दुकाने, बाजार बंद आहेत. अशा स्थितीत हा गेंडा रस्त्यावर फिरताना आढळला.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गेंडा रस्त्यावर चालताना दिसत आहे व आजुबाजूला मोजकीच माणसे दिसत आहेत. गेंडा एका व्यक्तीच्या मागे देखील लागतो. मात्र नंतर स्वतःच्या मार्गाने निघून जातो.

प्रवीण कासवान यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, गेंड्याने स्थिती आपल्या हातात घेण्याचे ठरवले व तो निरिक्षण करण्यासाठी गेला. जंगलातून गेंडे बाहेर अनेकदा येत असतात. लॉकडाऊन नसतानाही.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक जणांना हा व्हिडीओ पाहिला आहे.

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनसह शेकडो युजर्सनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Comment