लॉकडाऊन : वैधतेच्या आधीच डेटा संपल्यास घेऊ नका टेंशन

लॉकडाऊनमुळे लोक आपआपल्या घरातच आहे. संपुर्ण दिवस टिव्ही पाहणे आणि मोबाईल वापरण्यातच घालवत आहेत. तर काहीजण घरून ऑफिसचे काम करत आहेत. त्यामुळे अनेकदा वैधता असताना डाटा आधीच समाप्त होऊ शकतो. ज्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतो. ही समस्या लक्षात घेऊन टेलिकॉम कंपन्यांनी खास डाटा वाउचर्स बाजारात आणले आहेत. याविषयी जाणून घेऊया.

जिओ –

जिओच्या 21 रुपयांच्या रिचार्जमध्ये 2 जीबी डाटा मिळेल. सोबत कंपनी 200 नॉन-जिओ कॉलिंग मिनिटे मिळतील. जिओचा आणखी एक 51 रुपयांचा रिचार्ज प्लॅन फायदेशीर ठरू शकतो. या प्लॅनमध्ये 6 जीबी डाटा आणि 500 नॉन जिओ कॉलिंग मिनिटे मिळतील.

एअरटेल –

एअरटेलच्या 48 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 3 जीबी डाटा मिळेल. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.

व्होडाफोन –

डाटा वैधता असताना समाप्त झाला असल्यास, तुम्ही व्होडाफोनचा 16 रुपयांचा वाउचर रिचार्ज करू शकता. यात 1 जीबी डाटा आणि 24 तासांची वैधता मिळते. याशिवाय व्होडाफोनचा 48 रुपयांचा डाटा वाउचर उपलब्ध आहेत. डाटा वाउचरमध्ये 3 जीबी डाटा आणि 28 दिवसांची वैधता मिळेल.

दरम्यान, रिलायन्स जिओ आणि एअरटेलनंतर आता व्होडाफोन-आयडियाने देखील प्रीपेड युजर्सला एटीएमद्वारे मोबाईलवर रिचार्ज करण्याची सुविधा दिली आहे. या टेलिकॉम कंपन्यांचे ग्राहक आता थेट एटीएम मशीनद्वारे मोबाईल रिचार्ज करू शकतात.

व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, सीटी बँक, डीसीबी बँक, आयडीबीआय बँक आणि स्टँडर्ड बँकेच्या एटीएममध्ये ही सुविधा देण्यात आलेली आहे.

Leave a Comment