लॉकडाऊन : टीसीएस मोफत देत आहे डिजिटल सर्टिफिकेशन प्रोग्राम

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वचजण घरात कैद आहेत. विद्यार्थ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच घरात आहेत. मात्र अशा स्थितीत अनेक कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. या ऑफर अंतर्गत कंपन्या लोकाना ऑनलाईन शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

याच पार्श्वभुमीवर देशातील टॉप आयटी कंपनी टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसने (टीसीएस) 15 दिवसांच्या डिजिटल सर्टिफिकेशन प्रोग्रामची घोषणा केली आहे. हा प्रोग्राम पुर्णपणे मोफत असून, टीसीएस iON प्लेटफॉर्मवर आहे.

या 15 दिवसांच्या प्रोग्रामचे नाव करिअर एज (Career Edge) आहे. याला खासकरून कॉलेजचे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना लक्षात ठेवून तयार केले गेले आहे.

टीसीएसद्वारे सांगण्यात आले की, हा प्रोग्राम टीसीएसच्या iON डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. हा प्रोग्राम पुर्ण केल्यानंतर डिजिटल असेसमेंट होईल व त्यानंतर सर्टिफिकेट दिले जाईल.

या प्रोग्राममध्ये छोटे-छोटे व्हिडीओ, केस स्टडी, असेसमेंटचा समावेश करण्यात आलेला आहे. करिअरसाठी हा प्रोग्राम महत्त्वपुर्ण असून, कोणत्याही ठिकाणावरून, कोणत्याही वेळी  मोबाईल फोन, लॅपटॉप, डेस्कटॉप आणि टॅबलेटद्वारे हा प्रोग्राम पुर्ण करता येईल. याआधी टीसीएसने iON ने डिजिटल ग्लास रुम हा व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्म देखील सादर केला होता.

Leave a Comment