… म्हणून ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू करतात कोहलीची चापलूसी – क्लार्क

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आपल्या आयपीएलचा आकर्षक करार कायम ठेवण्यासाठी एवढे उत्सुक असायचे की, यामुळे ते भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि संघातील खेळाडूंना स्लेजिंग करणे टाळत असे व त्यांची चापलूसी करतात, असा दावा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने केला आहे.

क्लार्कच्या मते, ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये अनेक अविस्मरणीय सामने खेळले गेले आहेत. मात्र जेव्हाही ऑस्ट्रेलियन क्रिकेटर भारताविरुद्ध सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतात, तेव्हा त्यांचे लक्ष दरवर्षी होणाऱ्या आयपीएलवर असते.

क्लार्कने बिग स्पोर्ट्स ब्रेकफास्टला सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा स्थानिक पातळीवर आयपीएलच्या बाबतीत भारत आर्थिक बाजूने किती मजबूत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे.

मला असे वाटते की, ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि संभाव्यता इतर सर्वच संघ विरुद्ध वागले व भारताची चापलूसी केली. ते कोहली आणि इतर भारतीय संघातील खेळाडूंवर स्लेजिंग करण्यास घाबरत असे कारण त्यांना एप्रिलमध्ये त्यांच्यासोबत खेळायचे असते, असे मत क्लार्कने मांडले.

क्लार्कच्या मते काही ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सने आपल्या मैदानावर असलेल्या व्यक्तीमत्वाशी तडजोड केली, जेणेकरून आयपीएल लिलावात टॉप-10 मध्ये आल्यानंतर ते कोहलीला स्लेजिंग करू शकत नाहीत.

खेळाडूंचा व्यवहार असा असतो की, मी कोहलीला स्लेज करणार नाही. मला वाटते की माझी बंगळुरूच्या संघात निवड व्हावी. जेणेकरून मी सहा आठवड्यात 1 मिलियन डॉलर कमू शकतो, असे क्लार्क म्हणाला.

Leave a Comment