एखादा महालही फिका पडेल ऋतिकच्या नव्या ‘मर्सिडिज बेंझ व्ही-क्लास’समोर

अभिनेता ह्रतिक रोशन हा आपल्या अभिनय आणि डान्ससाठी ओळखला जातो. मात्र त्यासोबत ह्रतिकला कारची देखील आवड आहे. त्याच्याकडे मर्सिडीज-बेंझ एस-क्लास सेडांस, मर्सिडीज-मेबाक, रोल्स रॉयस घोस्ट, मिनी कूपर एस, रेंज रोव्हर आणि अनेक लग्झरी कार आहेत. आता त्याच्या ताफ्यात आणखी एक लग्झरी कार मर्सिडीज बेंझ व्ही-क्लासचा समावेश झाला आहे. या कारला डीसी2 कंपनीने ह्रतिकच्या या कारला कस्टमाइज्ड केले आहे.

मर्सिडीज बेंझ व्ही-क्लास मागील वर्षी लाँच झाली होती. या लग्झरी एमपीव्हीला अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी देखील खरेदी केले आहे. मात्र ह्रतिकला ही कार पुर्णपणे कस्टमाइज्ड हवी होती. डीसी2 कंपनीने या एमपीव्हीचे कॅबिन पुर्णपणे बदलले आहे.

Image Credited – overdrive

ह्रतिकच्या या एमपीव्हीमध्ये 4 सीट एकमेंकाच्या समोर देण्यात आले आहेत. यात पांढरे नापा लेदर अपहोल्स्ट्री देण्यात आली आहे. हे सीट्स 170 डिग्रीमध्ये रिक्लाईन होऊ शकतात व इलेक्ट्रिकद्वारे नियंत्रण करता येतील. मध्यभागी असलेले पॅनेलद्वारे सीट, लाईट्स आणि कॅबिनमधील इतर गोष्टी देखील निंयत्रित करता येतील. कारच्या इंटेरिअरमध्ये लेदर, लाकूड आणि क्रोमचा सुंदर वापर करण्यात आला आहे.

Image Credited – overdrive

कारच्या खिडक्यांना झाकण्यात आले आहे व छतावर कॅबिनसाठी पॅनेल लाईट्स देण्यात आली आहे. यात एंबियंट लायटिंगदेखील यात मिळेल. सेंट्रल कंसोलमध्ये कपहोल्डर्स, पार्सल ट्रे आणि लहानसा फ्रीज देण्यात आला आहे.

Image Credited – overdrive

कारला कस्टमाइज्ड करण्यासाठी प्रत्येक गोष्टीत ह्रतिकने विशेष लक्ष दिल्याचे डीसी2 चे संस्थापक छाबरिया यांनी सांगितले. हे संपुर्ण काम करण्यासाठी 3 महिने लागले.

व्ही क्लासच्या लांब व्हिलबेस मॉडेलची एक्स शोरुम किंमत 82 लाख रुपये आहे. कस्टमाईज्ड केल्याने कारचे वजन 40 किलो वाढले आहे. कंपनीने या कस्टमाइजिंगसाठी किती खर्च आला ते सांगितले नाही. मात्र त्यांचे सुरूवातीचे पॅकेज 34 लाख रुपयांपासून सुरू होते.

Leave a Comment