रेंटल स्टार्टअप रेव तर्फे विनाशुल्क कार सेवा


देशातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा आरोग्य दक्षता सुविधेवर परिणाम होऊ नये यासाठी सेल्फ ड्राईव्ह कार रेंटल स्टार्टअप (REVV) ने सरकारला मदतीचा हात देऊ केला आहे. कंपनीने आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १ हजाराहून अधिक कार्स झिरो शुल्क आकारून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. या कार्सचा वापर आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी होऊ शकणार आहे. कंपनी दिल्ली, बंगलोर, मुंबई, चेन्नई आणि पुणे या शहरांसाठी ही सेवा देणार आहे.

कंपनीची कार बुक करताना संबंधित आरोग्य सेवकाला त्याचे आयडी प्रूफ द्यावे लागेल. ज्या शहरात सेवा दिली जाणार आहे तेथील हेल्थ केअर सेक्टरशी जोडलेले लोक कार बुक करू शकतील. त्यासाठी ९२५०० ३५५५५ हा नंबर दिला गेला असून याच नंबरवर कार बुकिंग करता येणार आहे. नंतर ही सेवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळेल. सुरवातीला २५०० रुपये जमा करावे लागतील मात्र कार परत केल्यावर पूर्ण पैसे रिफंड होणार आहेत. त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही.

अनुपम अग्रवाल आणि करण जैन यांनी जुलै २०१५ मध्ये दिल्ली एनसीआर साठी रेव सेवा सुरु केली होती.

Leave a Comment