करोना जागृती, प्रसिद्ध पुतळ्यांना बांधले मास्क


फोटो सौजन्य पत्रिका
जगभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे नितांत आवश्यक आहे मात्र अजूनही या बाबतीत म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. अति वेगाने जग व्यापत चाललेल्या या विषाणू बाबत जनजागृतीचा एक मार्ग म्हणून विविध देशातील प्रसिद्ध पुतळ्यांना सुद्धा मास्क घातले गेले आहेत.

प्रसिद्ध व्यंगचित्रकार दिवंगत आर. के लक्ष्मण यांचा मानसपुत्र कॉमन मॅन भारतवासियांच्या मनात कायमचा वास्तव्यास आला आहे. मुंबईतील या कॉमन मॅनच्या पुतळ्याला असाच मास्क घातला गेला आहे. सरकार हरप्रकारे करोना बाबत जागृती साठी प्रयत्न करत आहेच त्याला पुतळ्यांच्या माध्यमातून जोड दिली जात आहे.


जपान मधील एका रेस्टोरंट बाहेर असलेल्या बुद्धाच्या पुतळ्याला मास्क घातला गेला आहे तर ब्रिटन मधील फ्रँक साईड बॉटम प्रतीमेलाही मास्क आणि हातात ग्लोव्ह घातले गेले आहेत. मॅलस्टरच्या सेंट्रल पार्क मधील मार्शल आर्ट आयकॉन आणि अभिनेता ब्रूस ली याच्या पुतळ्याला सुद्धा मास्क आणि ग्लोव्स घातले गेले आहेत.

ब्राझीलच्या रिओ द जानेरो येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कोपाकाबानाच्या सर्वात उंच ‘ख्राईस्ट द रिडीमर ‘ या पुतळ्याला सुद्धा काळा मास्क घातला गेला आहे.

Leave a Comment