नासा, स्पेस एक्सने का केले ‘झूम’ अ‍ॅप न वापरण्याचे आवाहन ?

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील शहर लॉकडाऊन आहेत. अशा स्थितीमध्ये लोक घरून काम करत आहेत. घरूनच ऑनलाईन मिटिंग्ससाठी स्काईप, झूम सारख्या अ‍ॅपचा वापर करत आहेत. भारतात झूम अ‍ॅप लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात डाउनलोड करण्यात आले आहे. मात्र जगातील दोन मोठ्या टेक्नोलॉजी कंपन्यांनी हे अ‍ॅप वापरू नये, असे सांगितले आहे.

झूम व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅपचा वापर सध्या जगभरातील 141 देशांमध्ये केला जात आहे. मात्र नासा आणि स्पेस एक्स सारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना झूम अ‍ॅपचा वापर करू नये, असे सांगितले आहे.

रिपोर्टनुसार, अ‍ॅपल कंपनीचे कर्मचारी देखील घरून काम करत आहेत. भविष्यातील प्लॅनिंग, प्रोडक्ट संदर्भातील मीटिंगसाठी कर्मचारी फेसटाइम, स्लॅक आणि वेबईएक्सचा वापर करत आहेत. त्यामुळे डाटा लीक होऊ नये यासाठी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना झूम अ‍ॅप वापरू नये असे सांगितले आहे.

स्पेस एक्स आणि नासा यांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांना झूम अ‍ॅप वापरू नये असे सांगितले आहे.

झूम अ‍ॅपचे सीईओ एरिक एस युआन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले की, डिसेंबर 2019 मध्ये झूम अ‍ॅपचे डेली अ‍ॅक्टिव्ह यूजर्सची संख्या 1 कोटी होती. जी मार्च 2020 मध्ये 20 कोटी झाली. लॉकडाऊनमुळे जगभरातील 20 देशांच्या 90 हजार पेक्षा अधिक शाळा देखील झूम अ‍ॅपचा वापर करत आहेत.

काही दिवसांपुर्वी भारताची कॉम्प्युटर इमर्जेंसी रिस्पाँस टीम आणि राष्ट्रीय सायबर-सुरक्षा एजेंसीने देखील या अ‍ॅपच्या सिक्युरिटीबाबत सुचित केले होते. झूम अ‍ॅप हल्ल्याचा मार्ग बनू शकतो.

या अ‍ॅपद्वारे हॅकर्स सरकारी आणि खाजगी कार्यालयांची माहिती चोरून त्याचा चुकीचा वापर करू शकतात.

Leave a Comment