लॉकडाऊन : एटीएम कार्डची वैधता संपली तरी असे काढा पैसे

टेक्नोलॉजीमुळे अनेक कामे घरी बसल्या बसल्या होतात. अनेक बँका देखील कार्डलेस व्यवहाराची सुविधा देत आहेत. जर लॉकडाऊनच्या काळात तुम्ही कोठे अडकला असाल व तुमच्याकडे एटीएम कार्ड नसले अथवा त्याच्या कालावधी संपला असली तरी तुम्ही विना कार्डचे पैसे काढू शकता.

सध्या ही सेवा केवळ एसबीआय, आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस बँक ही सेवा देत आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया –

स्टेट बँकेचे ग्राहक एका वेळी किमान 500 आणि जास्तीत जास्त 10 हजार रुपये काढू शकतात. याआधी योनो अ‍ॅपवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर, योनो कॅशवर क्लिक करा. येथे एटीएम विभाग दिसेल. तुम्हाला एटीएममधून जेवढे पैसे काढायचे आहेत ती रक्कम टाका. तुमच्या रजिस्टर्ज मोबाइल क्रमांकावर ओटीपी येल. एसबीआयच्या ज्या एटीएममध्ये कार्डलेस व्यवहाराची सुविधा असतात तेथून ओटीपीच्या मदतीने पैसे काढता येऊ शकतात. ओटीपी चार तासांसाठी वैध असेल.

आयसीआयसीआय बँक –

आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून थेट कार्डलेस रोख रक्कम काढता येत नाही. केवळ ज्या व्यक्तीचे बँकेत बचत खाते नाही तिच आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमद्वारे विना कार्ड पैसे काढू शकते. म्हणजेच जर आपण आपल्या खात्यातून दुसर्‍या व्यक्तीला पैसे पाठविले (ज्याचे खाते आयसीआयसीआय बँकेत नाही) तर ते आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून कार्डशिवाय काढता येईल. यासाठी तुमच्याकडे त्या व्यक्तीचा मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. यानंतर आयसीआयसीआय बँका डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकतात.

ग्राहकाला नेट बँकिंगवर लॉग इन करून दुसऱ्या व्यक्तीला बेनेफिशियरी स्वरूपात पैसे पाठवावे लागतील. प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर बेनेफिशियरी व्यक्तीच्या मोबाईलवर ओटीपी येईल व ग्राहकाच्या मोबाईलवर 4 आकडी पिन येईल. यानंतर बेनेफिशियरी व्यक्ती आयसीआयसीआयच्या एटीएममधून पिन आणि ओटीपीद्वारे पैसे काढू शकते. यासाठी एका महिन्याच्या मर्यादा 25 हजार आहे.

अ‍ॅक्सिस बँक –

आयसीआयसीआयप्रमाणेच अ‍ॅक्सिस बँकेची सुविधा आहे. ग्राहक स्वतः विना कार्ड पैसे काढू शकत नाहीत, मात्र दुसऱ्याला पैसे पाठवून विना कार्डचे पैसे काढू शकतात. यासाठी एकवेळेची मर्यादा 10 हजार आणि महिन्याची मर्यादा 25 हजार आहे. ट्रांजॅक्शन चार्जेस 25 रुपये आहेत.

Leave a Comment