महाभागांनी ओएलएक्सवर विकायला काढला चक्क ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’


अहमदाबाद : कोरोना व्हायरसचे देशवर आलेले संकट दिवसेंदिवस वाढत चालले असून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन यावर मात करण्यासाठी सुरु आहे. यातच गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी विकण्यासंबंधी ऑनलाइन जाहिरात देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

जगातील सर्वात उंच प्रतिमा स्टॅच्यू ऑफ युनिटीची विक्री करण्याची जाहिरात ऑनलाइन वेबसाइट ओएलक्सवर देण्यात आली आहे. ही जाहिरात पाहिल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही जाहिरात ओएलएक्सवर पोस्ट केली असून ज्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीची विक्री करण्यात येणार आहे, असे म्हटले आहे. तसेच, या जाहिरातीत स्टॅच्यू ऑफ युनिटी ३० हजार कोटी रुपयांना विकली जाणार असल्याचे म्हटले आहे.

त्याचबरोबर गुजरात सरकारला कोरोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी हॉस्पिटल आणि मेडिकल उपकरणांसाठी पैशांची गरज असल्याचे लिहिले. उप-जिल्हाधिकारी निलेश दुबे यांनी याप्रकरणी सांगितले की, ओएलएक्स कंपनीसोबत बातचीत झाल्यानंतर ही जाहिरात हटविण्यात आली आहे. दरम्यान, कोणी अशाप्रकारची जाहिरात वेबसाइटवर दिली होती, याचा शोध सुरु आहे.

Leave a Comment