‘पैसे नको, पीपीई किट्स पाहिजे’, केजरीवालांचे गंभीरला उत्तर

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी केंद्र फंड देत नसल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला होता. त्यानंतर भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी ट्विट करत दिल्लीच्या सरकारला 50 लाख रुपयांची मदत सादर केली. याशिवाय दिल्ली सरकार फंड स्विकारत नसल्याचा आरोप देखील गंभीर यांनी केला.

गंभीर यांनी आतापर्यंत कोट्यावधी रक्कम कोरोनाशी लढण्यासाठी दान केली आहे.

गंभीर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर टीका करत ट्विट केले की, मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सांगत आहेत की फंडची गरज आहे. मात्र त्यांच्या अंहकारामुळे त्यांनी आधी माझ्या एलएपीडीमधील 50 लाख रुपये स्विकारले नाहीत. मी अजून 50 लाख रुपये देत आहे, ज्यामुळे सामान्यांना त्रास होणार नाही. 1 कोटींमुळे त्वरित मास्क आणि पीपीई किट्स उपलब्ध होतील.

आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गंभीर यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे.

केजरीवाल यांनी ट्विट केले की, गौतमजी, तुमच्या प्रस्तावासाठी धन्यवाद. ही समस्या पैशांची नसून, पीपीई किट उपलब्ध नाहीत ही आहे. जर तुम्ही पीपीई किट उपलब्ध करून देण्यास मदत केली तर आम्ही तुमचे आभारी राहू. दिल्ली सरकार त्वरित त्यांना विकत घेईल.

Leave a Comment