लॉकडाऊन : डॉक्टरने 270 किमी प्रवास करत 8 वर्षीय रुग्णाला स्वतः सोडले घरी

कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर दिवस-रात्र हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत आणि हॉस्पिटलच्या बाहेर देखील लोकांची मदत करताना दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा सोडून, सर्व वाहतूक सेवा बंद असल्याने गरीबांचे घरी जाण्यासाठी हाल होत आहे. अशातच एक 8 वर्षीय मुलगी लॉकडाऊनमुळे आपल्या घरी जाऊ शकत नाही, अशा स्थिती एक डॉक्टर तिच्या मदतीसाठी पुढे आले.

कोलकत्ताच्या एसएसकेम हॉस्पिटलमध्ये 8 वर्षीय मुलगी आणि तिचे कुटुंब लॉकडाऊनमुळे अडकले होते. अखेर डॉक्टर बबलू सरदार यांनी त्यांची मदत त्यांना कोलकत्तापासून 270 किमी लांब सुलुंगा येथे स्वतः सोडले.

टाईम ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 25 मार्चला एनेस्थेटिस्ट बबूल सरदार यांनी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना पाहिले की, मजूर राजेश बास्की रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला घरी जाण्यासाठी विंनती करत आहेत. रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर घरी पोहचविण्यासाठी 13-14 हजार रुपये मागत होतो, जे राजेश बास्की यांना देणे शक्य नव्हते. राजे यांची 8 वर्षीय मुलगी एंजेला आतड्यांची समस्या असल्याने हॉस्पिटलमध्ये होती. ते बीरभूमी येथे दगड फोडण्याच्या यूनिटमध्ये काम करतात.

डॉक्टर बबलू सरदार यांना बास्की यांची समस्या कळल्यावर ते स्वतःला थांबवू शकले नाहीत व त्यांनी त्यांची मदत करण्याचे ठरवेल.

डॉक्टर सरदार यांनी सांगितले की, खूप रात्र झाली होती व ते कुटुंब घरी जाऊ शकत नव्हते. त्यामुळे मी मदत करण्याचा निर्णय घेतला. मी समजू शकतो की पैसे नसल्याने ते घरी जाऊ नकत नव्हते. त्यांच्या घरी आणखी एक मुलगी एकटी होती, त्याची देखील त्यांना चिंता होती.

डॉक्टरांनी सांगितले की, सकाळी 10 वाजता कामावर यायचे होते. मात्र रात्री जेवण करायलाचा जाण्याऐवजी कुटुंबाला घरी पोहचवण्याचा निर्णय घेतला. आम्ही हॉस्पिटलमधून रात्री 9 वाजता प्रवास सुरू केला होता व 270 किमी अंतर पार करून रात्री 3 वाजता सुलुंगा येथे पोहचलो.

विशेष म्हणजे या कुटुंबाला घरी सोडल्यानंतर ते स्वतः सकाळी 10 वाजता कामावर हजर होते. सोशल मीडियावर याबाबत लिहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या कामाचे कौतूक केले.

Leave a Comment