लॉकडाऊन : आर्थिक चणचण भासल्यास पीएफ खात्यातून काढू शकता अग्रिम रक्कम

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व सेवा, कंपन्या बंद आहेत. यामुळे लाखो नोकऱ्या संकटात आहेत. कर्मचाऱ्यांना वेतन न मिळण्याची देखील भिती आहे. अशा स्थितीत सरकारने कर्मचारी भविष्य निधी संघटनच्या (ईपीएफओ) जवळपास 6 कोटी सदस्यांसाठी ‘महामारी अग्रिम सुविधा’ सुरू केली आहे.

जर लॉकडाऊनमध्ये तुम्हाला पैशांची गरज असल्यास तुम्ही या सुविधेंतर्गत आपल्यी ईपीएफ खात्यातून 75 टक्के अथवा 3 महिने मूळ वेतन आणि महागाई भत्त्यापैकी जे कमी असेल, ते काढू शकतात. मूळ वेतन आणि महागाई भत्त्याची एका मर्यादेपर्यंत नॉन-रिफंडेबल रक्कम काढू शकता.

समजा, तुमच्या खात्यात 50 हजार रुपये आहेत आणि तुमचे मासिक मूळ वेतन व महागाई भत्ता 15 हजार रुपये आहे. 50 हजारांचे 75 टक्के 37,500 रुपये होतात आणि तीन महिन्यांचे एकूण वेतन 45 हजार रुपये होते. त्यामुळे दोघांपैकी कमी असलेली रक्कम 37,500 तुम्ही काढू शकता.

कोरोनामुळे ज्या संस्था/कंपन्या बंद पडल्यात असे कर्मचारी देखील याचा फायदा घेऊ शकतात. या सुविधेसाठी कोणतेही प्रमाणपत्र किंवा कागदपत्र द्यावे लागणार नाही. यासाठी तुम्ही ऑनलाईन क्लेम करू शकता. यासाठी तुमचा आधार आणि मोबाईल नंबर खात्याशी जोडलेला असावा.

असे करू शकता क्लेम –

यासाठी तुम्हाला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface या साईटवर जावे लागेल. येथे क्लेम फॉर्म 31 वर क्लिक करावे. क्लिक केल्यावर नवीन पेज उघडेल, तेथे तुम्हाला मागितलेली माहिती द्यावी लागेल. याशिवाय कागदपत्रे अपलोड करावे लागतील. आधार लिंक्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकताच क्लेम जमा होईल.

Leave a Comment