लॉकडाऊनमुळे जगभरात अडकले 40 हजार भारतीय नाविक

कोरोना व्हायरस महामारीमुळे संपुर्ण जग लॉकडाऊन झाले आहे. या स्थितीत जगभरात 40 हजार भारतीय नाविक आणि प्रवासी अडकले आहेत. 500 मालवाहू जहाजांवर 15,000, तर विविध प्रवासी जहाजांमध्ये 25,000 लोक अडकले आहेत.

समुद्र सेवेशी जुडलेले संघटनांचे म्हणणे आहे की, लॉकडाऊन समाप्त झाल्यानंतर सरकारने आवश्यक ती सहाय्यता देणार असल्याचे सांगितले आहे. एनयूएसआयसह अनेक संघटनांनी मंत्री मनसुख लाल मंडाविया यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हे मुद्दे उपस्थित केले. एमएएसएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन शिव हल्बे म्हणाले की, सुमारे 40,000 भारतीय विविध जहाजांवर अडकले आहेत. त्यांचा करार संपला असल्याने त्यांना मायदेशी परत यायचे आहे.

व्हिडीओ काँफ्रेसिंगद्वारे झालेल्या बैठकीत मंत्री म्हणाले की, परतल्यानंतर या नाविकांची चाचणी केली जाईल व काही दिवस त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले जाईल.

Leave a Comment