दिवा प्रज्वलित करतानाच्या मोदींच्या पोशाखाची का होतेय चर्चा?


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
दिल्लीतील निवासस्थानी पंतप्रधान मोदी यांनीही साऱ्या देशवासियांच्या बरोबर रात्री ९ वा. दीप प्रज्वलन केले त्यावेळी त्यांनी परिधान केलेला पोशाख मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. स्वतः मोदींनी या बाबत काहीही सांगितले नसले तरी त्यांनी परिधान केलेला निळा कुर्ता, पांढरी लुंगी आणि गमछा यामागचा अर्थ अनेकजण आपापल्या कुवतीप्रमाणे उलगडू लागले आहेत.

साऱ्या देशाला ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून मेणबत्ती, दीपक, टॉर्च पेटविण्याचे पंतप्रधान मोदींनी केलेले आवाहन देशभरातील सर्व नागरिकांनी पाळले तसेच पंतप्रधान मोदी यांनीही त्यांच्या निवासस्थानातील दिवे काही काळ बंद ठेऊन स्वतः दिवा प्रज्वलित केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

साऱ्या जगात कोविड १९ विषाणूच्या झालेल्या प्रसारामुळे आणि त्यामुळे माजलेल्या उत्पातामुळे निराशा आणि नकारात्मकता वातावरणात भरून राहिली असताना मोदी यांनी देशवासीयांसमवेत दिवा पेटवून नकारात्मक उर्जा नष्ट करण्याचा आत्मविश्वास आणि तसा संदेश देण्याचे काम केल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर काही लोकांच्या मते निसर्गात निळ्या रंगाचा प्रभाव सर्वाधिक आहे. निळा रंग ताकद, पौरुष आणि वीर भावाचे प्रतिक मानला जातो. भगवान राम, कृष्ण यांचा वर्ण निळा आहे तर सर्वात पॉवरफुल देव शंकर नीलकंठ आहे. मोदींनी निळ्या रंगाचा कुर्ता या भावनेनेच निवडला असावा असेही सांगितले जात आहे.

काही जणांच्या मते मोदींनी परिधान केलेला पोशाख हा पूर्ण भारतीय आहे आणि या वेशातील त्यांचे हे वेगळे रूप जगभर भारतीयत्वाची, भारतीयांची एकजूट दाखवून देणारे ठरले आहे.

Leave a Comment