ही आहे जगातील सर्वात महाग भाजी


फोटो सौजन्य फ्लिकर
हिरव्या पालेभाज्या आहारात नेहमी असाव्यात, त्यातून शरीराला आवश्यक अशी अनेक द्रव्ये सहज उपलब्ध होतात, या भाज्या सहज परवडतात हे आपल्याला माहिती आहेच. एखादी भाजी महाग असून असून किती असेल असा जर प्रश्न तुमच्या मनात असेल, तर त्याचे उत्तर मात्र थक्क करणारे आहे. होय! जगातील सर्वात महाग हिरवी भाजी चक्क किलोला ८२ हजार रुपये दराने विकली जाते. म्हणजे दोन तोळे सोने किंवा दोन किलो चांदीची किंमत या भाजीसाठी मोजावी लागते.

हॉप शूट्स या नावाने ही भाजी ओळखली जाते. हिचा जागतिक बाजारातील दर किलोला १ हजार युरो असा आहे. या भाजीची फुलेही आहारात वापरली जातात त्यांना हॉप कॉर्न असे म्हटले जाते. फुलाचा वापर प्रामुख्याने बिअर साठी केला जातो तर बाकी देठे खाण्यासाठी वापरली जातात. ही भाजी म्हणजे औषधांचे गुणभांडार मानली जाते. अँटीबायोटीक औषधात सुद्धा तिचा वापर होतो. दाताची दुखणी, टीबी सारख्या व्याधी तिच्या सेवनाने बऱ्या होतात. ही भाजी कच्च्या स्वरुपात सुद्धा खाल्ली जाते. देठांचा वापर सॅलड मध्ये केला जातो. चवीला ही भाजी कडू असते. त्याचे लोणचे सुद्धा बनवितात.

ख्रिस्तपूर्व ८०० शतकापासून या भाजीची माहिती लोकांना होती आणि तिचा आहारात वापर केला जात होता. त्याकाळी ही भाजी बिअर मध्ये मिसळून प्यायली जात असे. उत्तर जर्मनीत तिची शेती प्रथम सुरु झाली आता जगभरात ही भाजी पिकविली जाते. भारतात हिमाचल मधील लाहोल स्पिती जिल्ह्यात तिची शेती केली जाते मात्र आपल्याकडे या भाजीला फार ग्राहक नाहीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment