सौरव गांगुलीची अशी झाली होती भूताशी भेट


फोटो सौजन्य स्पोर्ट्स टाईम
जगभरात सर्वत्र भूतखेत, प्रेतात्मे यांच्या कथा आवडीने वाचल्या, ऐकल्या आणि चर्चिल्या जातात. भुताचा प्रत्यक्ष अनुभव आल्याचे अनेक लोक सांगतात आणि त्यात समाजाच्या सर्व थरातील लोकांचा समावेश आहे. त्यात गरीब आहेत, श्रीमंत आहेत तसेच अडाणी आहेत आणि सुशिक्षितही.

फार लांबची गोष्ट कशाला? आपल्या टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली आणि धोनी हेही त्याला अपवाद नाहीत. २००२ मध्ये भारतीय क्रिकेट टीम इंग्लंडला गेली होती तो दौरा सौरव गांगुलीसाठी अविस्मरणीय ठरला तो त्याला आलेल्या अमानवी अनुभवामुळे. दरहम येथील लमुली कॅसल हॉटेलमध्ये टीमचा मुक्काम होता. रात्री खेळाडू झोपल्यावर सौरवला अचानक त्याच्या खोलीतील नळ सुरु झाल्याचा आवाज आला. त्याने उठून पहिले तर नळ बंद. पुन्हा थोड्यावेळाने हाच प्रकार. तिसऱ्या वेळी हाच प्रकार घडला तेव्हा मात्र सौरव घाबरला आणि शेजारी रॉबीनसिंग याच्या खोलीत गेला.

सौरवने आपण घाबरलो आहे हे रॉबीनला कळू नये म्हणून खोलीत घडलेला प्रकार न सांगता खोलीतील हिटिंग सुरु नाही म्हणून येथे राहू का असे विचारले होते आणि रॉबीनने त्याला आनंदाने परवानगी दिली होती. या हॉटेल मध्ये अश्या अमानवी घटना नेहमीच घडतात असे सांगितले जाते. धोनी यालाही याच हॉटेल मध्ये त्याच्या रूम मध्ये रहस्यमय सावली दिसली होती तसेच स्तुअर्ट ब्रोंड यालाही त्याच्या खोलीत आणखी कुणीतरी वावरत असल्याचे अनेकदा जाणवले होते.

Leave a Comment