मोदींच्या दीप प्रज्वलानाच्या आवाहनाला टाटा, अंबानींचा प्रतिसाद


फोटो सौजन्य पत्रिका
पंतप्रधान मोदींच्या ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरात दीप प्रज्वलित करण्याच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून देशातील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच बडे उद्योजक, बॉलीवूड सेलेब्रिटी यांनीही त्यात योगदान दिले आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी त्यांच्या घरी हातात दिवा धरलेला फोटो सोशल मीडियावर आला आहे तसेच देशातील सर्वात श्रीमंत, रिलायंसचे मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता यांनीही त्यांच्या अँटीलीया या निवासस्थानी या उपक्रमात योगदान दिले आहे. अँटीलीयामध्ये या वेळी अनेक ठिकाणी पणत्या पेटविल्या गेल्या होत्या.

करोना पासून देशाची रक्षा, करोनाला मात देण्यासठी सर्व देशाची प्रतिबद्धता आणि एकजूट याचे हे प्रदर्शन आहे तसेच अश्या अवघड परिस्थितीत जीवाची बाजी लावून आपल्या देशबांधवांच्या रक्षणासाठी झटत असेलेले आरोग्य कर्मचारी, सुरक्षा जवान यांना सन्मान देण्यासाठी हा सोहळा केला गेला आहे. तसेच देशाची या संकटात असलेली एकजूट आणि हे संकट पळवून लावण्यासाठी करावयाचा संकल्प, समर्पण यांचेही प्रतिक आहे.

प्रसिद्ध गायक सोनू निगम दुबई मध्ये अडकले आहेत. त्यांनी तेथेही दीप प्रज्वलित करून ‘आओ दिये जलाये’ हे गाणे गाऊन देशवासियांना नवी प्रेरणा देण्याचे काम केले आहे.

Leave a Comment