न्युयॉर्क प्राणीसंग्रहालयातील वाघिणीला करोना संसर्ग


फोटो सौजन्य मेट्रो
कोविड १९ने अमेरिकेत त्यातही न्युयॉर्क शहरात एकच उच्छाद मांडला असताना येथील ब्रोन्क्स प्राणीसंग्रहालयात सुद्धा या विषाणूचा प्रवेश झाला आहे. या झु मधील नादिया नावाच्या एका मलायन वाघिणीची कोविड १९ टेस्ट पोझिटिव्ह आली आहे. गेल्या २४ तासात न्युयॉर्क मध्ये कोविड १९ ने तब्बल १२०० बळी घेतले असून एका दिवसात कोविडला बळी पडलेल्या लोकांची ही सर्वाधिक संख्या आहे.

बीबीसीच्या बातमीनुसार न्युयॉर्कच्या ब्रोन्क्स प्राणिसंग्रहालयातील नादिया या चार वर्षाच्या वाघिणीसह अन्य ६ सिंह आणि वाघ आजारी असून त्यांच्यात २७ मार्च पासून आजाराची लक्षणे दिसू लागली होती. या सर्वाना कोरडा खोकला येत होता. त्यातील नादिया नावाच्या वाघिणीची कोविड १९ टेस्ट पोझिटिव्ह आली आहे. झु मधल्या कर्मचाऱ्यामुळे हा संसर्ग झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या सर्व प्राण्यांवर उपचार सुरु आहेत. या प्राण्यांची भूक कमी झाल्याचे व्हेटरनरी डॉक्टर सांगत आहेत.

वाघाला करोना होण्याची जगातील ही पहिलीच केस आहे. मात्र यापूर्वी हॉंगकॉंग मधील एक पाळीव कुत्रा आणि बेल्जियम मधील एक मांजरी या विषाणूला बळी पडले आहेत.

Leave a Comment