व्हायरल; नातेवाईक न आल्याने डॉक्टरांनी रुग्णाला खावू घातले

कोरोना व्हायरसच्या लढ्यात डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी सर्वात पुढे उभे आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून हे कर्मचारी रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे. सध्या अशाच एका डॉक्टराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात डॉक्टर स्वतः एका रुग्णाला हाताने खायला घालताना दिसत आहे.

रुग्णाचे नातेवाईक न आल्याने डॉक्टर स्वतः आपल्या हाताने रुग्णाला खायला घातले. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे.

अरूण जनार्धन नावाच्या युजरने हा फोटो शेअर केला आहे. ट्विटनुसार, रुग्णाचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये येऊ शकत नव्हते. म्हणून मद्रास मेडिकल मिशनचे वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर जॉर्जी अब्राहम हे आपल्या हाताने रुग्णाला खायला घालतात.

सोशल मीडियावर नेटकरी या डॉक्टरांचे भरभरून कौतूक व त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करत आहेत.

Leave a Comment