जीवन विमा पॉलिसीधारकांना दिलासा, 30 दिवसांची अतिरिक्त मुदत

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) जीवन विमा धारकांना हप्ता भरण्यासाठी 30 दिवसांची अधिक वेळ कालावधी दिला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन आहे, त्यामुळे इरडाने हा निर्णय घेतला आहे.

ज्या जीवन विमाधारकांच्या विम्याच्या नूतनीकरणाची तारीख मार्च आणि एप्रिलमध्ये येते, त्यांना हप्ता भरण्यासाठी 30 दिवसांचा अधिक वेळ मिळेल. इरडाने आरोग्य विमा आणि थर्ड पार्टी मोटर विम्याच्या नूतनीकरणाचा हप्ता भरण्यासाठी आधीच अतिरिक्त वेळ दिला आहे.

विमा कंपन्या आणि जीवन विमा परिषदेने चिंता व्यक्त केली होती की लॉकडाऊनच्या काळात विमाधारकांना हफ्ते भरण्यासाठी अडचण येत होती.

इरडाने म्हटले आहे की, जेथे युनिटशी संबंधित विम्याचा कालावधी 31 मे 2020 पर्यंत पुर्ण होत आहेत आणि फंड मूल्य एकरकमी भरणे आवश्यक आहे, तेथे विमा कंपन्या संबंधित तरतुदींनुसार ‘सेटलमेंट पर्याय’ देऊ शकतात. काही विम्यात एकरक्कमी पर्याय नसला, तरी तसा पर्याय दिला जाऊ शकतो.

Leave a Comment