फ्लोरिडातील अलिशान हॉटेलमध्ये करोना आयसोलेशनची सोय


फोटो सौजन्य मियामी हेराल्ड
अमेरिकेत करोना विषाणूचा प्रभाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. फ्लोरिडा राज्यातही करोना संसर्ग वेगाने पसरत आहे. करोना ग्रस्त रुग्णांना आयसोलेशन सुविधा पुरविण्यासाठी फ्लोरिडा प्रशासनाने सोमवारी मियामी या जगप्रसिध आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या बीच वरील अलिशान हॉटेल्स वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सोयीसुविधांसह ही हॉटेल्स क्वारंटाईन साठी तयार केली जात आहेत असे समजते.

राज्यातील करोना विषाणूची चेन ब्रेक करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्याच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख जारेड मोस्कोवीच या संदर्भात माहिती देताना म्हणाले, लहान मोठ्या सर्व हॉटेल ग्रुप बरोबर आमच्या चर्चा सुरु आहेत. यात हॉटेल्सचे काही नुकसान नाही कारण आता तसेही येथे पर्यटक येत नाहीयेत. त्यामुळे आम्हीच खोली भाडे भरून करोनाग्रस्तांना क्वारंटाईन करण्याची सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात या हॉटेल्स मध्ये आयसीयु सुरु केले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment