पाण्यात उभे राहणारे अद्भूत जहाज


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
पाण्यावर तरंगणारी जहाजे आपण नेहमीच पाहतो पण एखादे जहाज पाण्यात ९० अशांच्या कोनात उभे राहत असल्याची माहिती फार कुणाला नसेल. हे खास जहाज अमेरिकन नेव्हीचे असून याचा आकार एखाद्या चमच्याप्रमाणे आहे. विशेष म्हणजे नेव्हीचे हे खूप जुने जहाज असून त्याचे नाव आरपी फ्लिप असे आहे. या जहाजाचा वापर संशोधन कामासाठी केला जातो. समुद्री जीवांचे संशोधन आणि माहिती गोळा करणारे हे एकमेव अजब जहाज आहे.


हे जहाज आडव्या स्थितीतून उभ्या स्थितीत नेण्यासाठी २८ मिनिटे लागतात. त्यावेळी हँडल मध्ये ७०० टन पाणी व क्रेडल मध्ये हवा भरली जाते. या जहाजाची एकूण लांबी ३३५ फुट आहे मात्र पाण्यावर उभे करताना त्याचा ५५ फुटाचा भाग पाण्याच्या वर राहतो तर बाकी पाण्यात राहतो. उभ्या स्थितीत या जहाजावर जोरदार लाटांचा काहीही परिणाम होत नाही. १९६२ मध्ये हे जहाज तयार केले गेले आणि ते तयार केले सायंटिस्ट डॉ. फ्रेड फिशर आणि डॉ, फ्रेड स्पाईस यांनी.

१९९५ मध्ये या जहाजाचा मेकओव्हर केला गेला तेव्हा त्यासाठी २० लाख डॉलर्स खर्च आला. या जहाजाच्या प्रत्येक रूम मध्ये सामानाचा डबल सेट आहे. म्हणजे दोन बेड, दोन सिंक असे. त्यामागे जहाज कोणत्याही स्थितीत असले तरी एक सेट उपयोगात राहावा अशी योजना आहे. ऑपरेशन दरम्यान या जहाजावर १६ लोकांचा क्रू असतो आणि जहाज उभे करताना हे सर्व जण बाहेरच्या डेकवर येतात. या जहाजात जमिनीच्या भिंती होतात आणि भिंतीची जमीन होते.

Leave a Comment