डिसेंबर मध्ये आलिया- रणबीर होणार चतुर्भुज


फोटो सौजन्य न्युज डॉट कॉम
बॉलीवूड मध्ये आलीया भट्ट आणि रणबीर कपूरचे प्रेमप्रकरण बराच काळ चर्चेत असताना मध्येच त्यांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता रणबीर आलिया डिसेंबर मध्ये चतुर्भुज होत असल्याची वार्ता आली आहे. या दोघांचे डेस्टीनेशन वेडिंग होणार अशी चर्चा होती मात्र आताच्या माहितीनुसार मुंबईतच ही दोघे सात फेरे घेणार असून २१ डिसेंबर पासून चार दिवस हा लग्नसोहळा साजरा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ऋषीकपूर यांना कॅन्सर झाला होता पण आता त्यांची तब्येत खुपच सुधारली असल्याने दोन्ही कुटुंबांकडून लग्नाची घाई सुरु आहे. लग्नाची तारीख ऐनवेळी ठरविली जाणार आहे मात्र लग्नविधी २१ डिसेंबर पासून सुरु होणार आहेत. आलिया आणि रणवीरचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता त्यात ते दोघे रणबीरच्या कुत्र्यासह फिरताना दिसत होते. लॉक डाऊन जारी झाल्यापासून ते दोघे एकत्र राहत असल्याचेही सांगितले जात आहे. या जोडीचा ब्रह्मास्त्र चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे रणबीर आलीया प्रथमच या चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत.

Leave a Comment