गोष्ट जुनागढच्या नवाबाची आणि त्याच्या कुत्रीच्या लग्नाची


फोटो सौजन्य पायोनियर
गोष्ट भारताला स्वातंत्र मिळण्यापूर्वीची असली तरी अजूनही कधी मधी एका अनोख्या आणि राजेशाही लग्नाची आणि ते लग्न लावणाऱ्या जुनागढच्या नवाबाच्या चक्रमपणाचीही चर्चा होत असते. या नवाबाचे नाव होते सर् महाबत खान रसूल खान. त्याला कुत्री पाळण्याचा अतोनात नाद होता आणि त्याच्याकडे ८०० पेक्षा अधिक कुत्री होती. पण एक कुत्री याची विशेष लाडकी होती आणि तिचे नाव त्याने रोशनआरा असे ठेवले होते. हा नवाब त्याच्या कुत्रे प्रेमानेच प्रसिध्द होता.

रोशनआरा वयात आली तेव्हा तिचे लग्न करावे असे या नवाबाला वाटले पण तिच्यासाठी त्याला राजघराण्यातील जोडीदार कुत्रा हवा होता. नवरदेवाचा शोध सुरु झाला आणि अखेर मंगलोरच्या नवाबाच्या शिकारी कुत्राची निवड वर म्हणून केली गेली. रोशनआरा खुपच लाडात वाढली होती तिला कधी एकटे सोडले गेले नव्हते. तिचे लग्न सर्वांच्या कायम स्मरणात राहिले पाहिजे म्हणून नवाब महाबत खान यांनी देशभरातील सर्व संस्थानिक तसेच त्यावेळचे व्होईसरॉय लॉर्ड इर्विन यानाही निमंत्रण दिले होते. हे व्होइसरॉय सोडून बाकी सर्व निमंत्रित लग्नाला आले.

वर कुत्या यला स्टेशनवरून आणण्यासाठी स्वतः नवाब गेला आणि २५० सजविलेली कुत्री, हत्ती त्याने वराच्या स्वागतासाठी नेले होते. या वर कुत्र्याचे नाव होते बुम्बी. लग्नापूर्वी रोशनआराला अत्तराने अंघोळ घातली गेली, विविध दागदागिने आणि सिल्कच्या पोशाखाने तिला नटविले गेले. या निमित्त ५० हजार लोकांना मेजवानी दिली गेली. हा लग्न सोहळा तीन दिवस सुरु होता. विशेष म्हणजे रोशनआराची सासरी रवानगी झाली नाही तर बुम्बीलाच घरजावई करून घेतले गेले होते. या लग्नाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार आले होते. फिल्म काढली गेली, फोटो काढले गेले आणि लग्नाची प्रसिद्धी केली गेली असेही समजते.

Leave a Comment