व्हायरल : लॉकडाऊन दरम्यान शेजाऱ्याचे ड्रोनच्या माध्यमातून पुरवले चोचले

लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. या स्थितीत तळीरामांचे विशेष हाल होत आहेत. मात्र काहीजण याही स्थितीमध्ये कोणत्याना कोणत्या पद्धतीने दारू मिळवत आहेत.

काही दिवसांपुर्वी ड्रोनने गरजू मित्राला टॉयलेट पेपर पाठवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता अशाच प्रकारे ऑस्ट्रेलियातील एका पठ्ठ्याने आपल्या मित्रांना ड्रोनच्या सहाय्याने चक्क व्हिस्की पाठवली आहे.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, व्यक्ती सोशल डिस्टेंसिंग पाळत ड्रोनच्या मदतीने आपल्या शेजारील मित्रांना व्हिस्कीचे दोन ग्लास पाठवतो.

मित्राला अशा हटके पद्धतीने व्हिस्की पाठवण्याची कल्पना नेटकऱ्यांना देखील भलतीच आवडली.

Leave a Comment