लॉकडाऊन : रिकाम्या वेळेत या गोष्टींद्वारे करा व्यक्तिमत्वामध्ये बदल

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे लोक घरात बसून आपल्या कुटुंबियासोबत वेळ घालवत आहेत. या वेळेत तुम्ही व्यायाम, कुकिंग आणि गार्डनिंग सारख्या गोष्टी देखील करू शकता. याशिवाय काही नवीन गोष्टी शिकून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये देखील बदल करू शकता.

Image Credited – Amarujala

नवीन भाषा शिका –

जर लॉकडाऊनच्या काळात नवीन भाषा शिकण्याचा विचार करत असाल तर Duolingo आणि HelloTalk सारखे मोबाईल अ‍ॅप वापरू शकता. या अ‍ॅप्समध्ये अनेक फीचर आहेत, ज्याद्वारे तुम्ही नवीन भाषा सोप्या पद्धतीने शिकू शकता.

Image Credited – Amarujala

ऑडिओबुक –

जर तुम्हाला एखाद्या नवीन विषयासंबंधी जाणून घ्यायचे असेल, तर अशा वेळेस ऑडिओबुक सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्ही LibriVox, Audible आणि Goodreads सारखे अ‍ॅप वापरू शकता.

Image Credited – Amarujala

पॉडकास्ट –

पॉडकास्टमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचा विषय ऐकायला मिळेल, त्यामुळे हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही जिओ सावन सारखे अ‍ॅप्स वापरून पॉडकास्ट ऐकू शकता.

Image Credited – Amarujala

अ‍ॅपच्या माध्यमातून लावा चांगल्या सवयी –

जर तुम्हाला नवीन सवयी स्वतःमध्ये विकसित करायच्या असतील तर तुम्ही Loop Habit Tracker अ‍ॅप वापरू शकता. या अ‍ॅपद्वारे एक आठवड्याभरात चांगल्या सवयी स्वतःमध्ये विकसित करू शकता. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर देखील उपलब्ध आहेत.

 

Leave a Comment