चालू महिन्यात तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद

मागील काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी बँकांनी आपल्या कामकाजाची वेळ बदलली आहे. याशिवाय ग्राहकांनी बँकेत न येता, डिजिटल व्यवहार करावे असे आवाहन देखील करण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात साप्तहिक सुट्टी आणि अन्य कारणांमुळे बँका अनेक दिवस बंद राहणार आहेत.

1 एप्रिलला वार्षिक क्लोजिंग आणि 2 एप्रिलला रामनवमीमुळे देशातील अनेक बँका बंद होत्या. याशिवाय 6, 10, 13 आणि 25 एप्रिलला अधिकतर बँकेत कोणतेही काम होणार नाही.

6 एप्रिलला महावीर जंयती, 10 एप्रिलला गुड फ्रायडे, 14 एप्रिलला बैसाखी आणि 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने बँका बंद असतील.

या व्यतिरिक्त 15 एप्रिलला बोहाग बिहू/हिमाचल डे, 20 एप्रिलला गरिया पूजा आणि 25 एप्रिलला परशूराम पूजा असल्याने अनेक राज्यातील बँका बंद असतील. तसेच 5, 12, 19  आणि 15 एप्रिलला रविवार, तर 11 एप्रिलला दुसरा शनिवार आणि 25 एप्रिलला चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. बँका या दिवशी बंद असल्या तर डिजिटल व्यवहार सुरू राहतील.

Leave a Comment