लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या वडिलांची थेट पोलिसात तक्रार

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र असे असताना देखील काहीजण विनाकारण बाहेर फिरताना आढळतात. पोलीस वेगवेगळे प्रयत्न करून अशा लोकांना घरात बसण्याचे आवाहन करत आहेत. गरज पडल्यास शिक्षा देखील केली जात आहे.

मात्र दिल्लीच्या वसंत कुंज येथे घडलेल्या एका प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. वसंत कुंज येथील एका 30 वर्षीय मुलाने चक्क आपल्या वडिलांविरोधातच पोलिसात तक्रार दाखल केली आहे व या तक्रारीचे कारण लॉकडाऊन आहे.

वडील लॉकडाऊनचे पालन करत नसल्याने मुलाने थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी देखील वडिलांविरोधात एफआयआर नोंदवली. मुलाच्या तक्रारीनुसार वडील लॉकडाऊन न पाळता दररोज बाहेर जातात. आता या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

https://twitter.com/meself_amirah/status/1245987025984974849

सोशल मीडियावर काही युजर्स मुलाचे कौतुक करत आहेत, तर काहीजण खिल्ली उडवत आहेत.

Leave a Comment