पुण्यात घरपोच वैद्यकीय सेवा देण्यासाठी 15 फिरते दवाखाने सुरू

कोरोना व्हायरसमुळे अनेक खाजगी क्लिनिक्स बंद असल्याने पुणे महानगरपालिकेच्यावतीने फिरते दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. यासाठी 15 रुग्णवाहिका/बसला दवाखान्यामध्ये बदलण्यात आले आहे.  हे अभियान भारतीय जैन संघटनेच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे. याद्वारे झोपडपट्टी भागात व शेल्टरमध्ये राहणाऱ्यांपर्यंत वैद्यकीय सेवा पुरवण्याचे लक्ष्य आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. अंजली सबाने यांच्यानुसार, प्रत्येक 15 वॉर्डसाठी एका रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. यासोबत एक डॉक्टर, नर्स, एक अटेंडेंट आणि एक वॉलिंटियर असतील. जे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत विविध भागात काम करतील.

महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, आमचे मुख्य लक्ष्य वृद्धांची काळजी घेणे आहे व सोबतच महानगरपालिकांच्या शाळांमध्ये तात्पुरते शेल्टरमध्ये राहणाऱ्यांची तपासणी करणे हे आहे.

डॉ. सबाने यांच्यानुसार, हे फिरत दवाखाने दररोज 2500 लोकांची तपासणी करतील व लक्षणांची तपासणी करण्याची दिवसाची क्षमता 500 जणांची आहे. ही सेवा कोरोना व्हायरस पुर्णपणे जात नाही, तोपर्यंत सुरू राहील.

यासाठी भारतीय जैन संघटनेने आपल्या 15 बस आणि टेम्पोचे हॉस्पिटलमध्ये रुपांतर केले आहे. शिवाजी नगर, कोथरूड, बावधान, येरवडा, कोंढवा, हडपसर, कसबा पेठ अशा पुण्यातील सर्वच भागांमध्ये नागरिकांना ही सेवा मिळेल.

Leave a Comment