तीन पायाच्या माणसाची अजब कहाणी


फोटो सौजन्य पत्रिका
ईश्वरी लीला अगाध आहे, तो कुणाला कुठले रूप देईल सांगता येत नाही. तरी जगातील बहुतेक सर्व माणसे रंग रुप वेगळी असले तरी एकसारखीच आहेत. मात्र काही अपंग एखादा अवयव कमी घेऊन जन्माला येतो. १९ व्या शतकात १८ मे १८८९ साली इटलीच्या सिसिली प्रांतात फ्रांसेस्को फ्रांक लेटीनी नावाचा एक मुलगा मात्र एक जास्तीचा अवयव घेऊन जन्माला आला होता. फ्रांसेस्कोला तीन पाय होते आणि दोन गुप्तंगे होती. यासह तो ७७ वर्षाचे आयुष्य जगला.

१२ भावंडात ५ वा असलेल्या फ्रांसेस्कोला लहानपणीच त्याच्या आईवडिलांनी काका कडे पाठविले आणि तेथेच तो मोठा झाला. त्याला खरेतर चार पाय होते पण चौथा पाय तिसऱ्या पायाच्या गुडघ्यातून बाहेर आलेला होता आणि तो पूर्ण विकसित झालेला नव्हता. फ्रास्न्सेस्कोने हा जास्तीचा पाय काढून टाकण्याचा प्रयत्न केला नव्हता कारण डॉक्टरनी त्याला त्यामुळे कायमचे अपंगत्व येण्याचा धोका असल्याचे सांगितले होते. वास्तविक हा एक आजार होता. फ्रांसेस्कोच्या शरीरात अर्धे जुळे वाढले होते आणि ते पाठीच्या कण्याला चिकटले होते.

विशेष म्हणजे फ्रान्सिस्कोची गाठ १२ व्या वर्षी एका सर्कस मालकाशी पडली. विन्सेन्जो नावाच्या या सर्कस मालकाने त्याला सर्कसमध्ये नोकरी दिली आणि त्याने प्रेक्षकांची पसंती मिळविली. तो त्याच्या तिसऱ्या पायाने फुटबॉलला लाथ मारत असे आणि या तिसऱ्या पायाचा उपयोग खुर्चीसारखा करून त्यावर बसत असे. तो आनंदी होता आणि हजरजबाबीसुद्धा. कुणी त्याला तो बुटांचे जोड कसे घेतोस विचारले की तो उत्तर देई,’ मी बुटाच्या दोन जोड्या घेतो, तीन बूट मी वापरतो आणि एका माझ्या एका मित्राला एकच पाय आहे त्याला देतो.’ यामुळे तो प्रेक्षकांचा खूप आवडता बनला होता. त्याने लग्न केले होते आणि त्याला चार मुले होती.

Leave a Comment