महामारीमुळे विम्बल्डन रद्द होण्याची पहिलीच वेळ


टेनिस स्पर्धेतील तिसरे ग्रँड स्लॅम आणि अतिशय प्रतिष्ठेची विम्बल्डन स्पर्धा यंदा करोनामुळे रद्द केली गेली असून महामारीमुळे ही स्पर्धा रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी सुद्धा ही स्पर्धा रद्द केली गेली होती. ही स्पर्धा रद्द होण्याचा अनेक दिग्गज खेळाडूंवर परिणाम होणार आहे. रॉजर फेडरर, सेरेना विलियम्स आणि व्हीनस यांच्यासाठी कदाचित ही शेवटची स्पर्धा असणार होती कारण हे तिघे दिग्गज खेळाडू पुढील वर्षी चाळीशी पार करत आहेत.

यंदा ही स्पर्धा २८ जून पासून होणार होती. नोवाक जोकोविच आणि सिमोन हालेप त्यांचा खिताब कायम राखण्यासाठी खेळणार होते. ही स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये घेतली जावी अशी सूचना केली गेली होती मात्र ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबने त्याला नकार दिला होता. या क्लबने एक निवेदन नुकतेच दिले आहे. त्यात स्पर्धा रद्द करावी लागली याविषयी खेद व्यक्त केला गेला आहे आणि ही १३४ वी चँपियनशिप स्पर्धा २८ जून ते ११ जुलै २०२१ मध्ये खेळली जाईल असा खुलासा केला आहे.

Leave a Comment