उद्धव ठाकरेंवर पुन्हा शपथविधीची वेळ येणार?


फोटो सौजन्य कलिंग टीव्ही
सध्या राज्यात लागू असलेल्या लॉक डाऊन मुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतःच अडचणीत आले असून त्यांच्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची पाळी येऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ २८ नोव्हेंबरला घेताना उद्धव विधानसभा अथवा विधान परिषद असे दोन्ही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यामुळे घटनेच्या कलम १६४ (४) नुसार त्यांना सहा महिन्यात म्हणजे २८ मे पर्यंत या दोन्ही सभागृहापैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून येणे बंधनकारक आहे.

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या नऊ जागा २४ एप्रिल रोजी रिकाम्या होत आहेत आणि त्यापैकी एका जागेवरून निवडून येण्याचा उद्धव यांचा मानस होता. मात्र करोना मुळे सर्व राजकीय हालचालींना खीळ बसली आहे त्याचबरोबर निवडणूक आयोगाने मार्च मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका स्थगित केल्या आहेत. त्याचबरोबर विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. मे पर्यंत या तारखा जाहीर झाल्या नाहीत तर उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागेल आणि पुन्हा नव्याने शपथविधी करावा लागेल असे कायदेतज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment