टीक-टॉकला टक्कर देण्यासाठी युट्यूब आणणार ‘शॉर्ट्स’ अ‍ॅप

शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीकटॉकला टक्कर देण्यासाठी युट्यूब लवकरच एक शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. या अ‍ॅपचे नाव शॉर्ट्स (Shorts) असून, हे अ‍ॅप टीकटॉकला टक्कर देईल.

शॉर्ट्स अ‍ॅपमध्ये युजर्सला टीकटॉकच्या तुलनेत अधिक म्यूझिक आणि व्हिडीओ फीचर मिळू शकतात. कारण युट्यूबकडे आधीच म्यूझिकची मोठी लायब्रेरी व म्यूझिकचे लायसन्स आहे. मात्र अद्याप या अ‍ॅपच्या लाँचिंगबाबत युट्यूबकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

टीकटॉकला 2016 साली चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. त्यानंतर 2018 मध्ये जगभरात हे अ‍ॅप लाँच केल्यानंतर याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. टीकटॉक सध्या गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप स्टोरवर देखील सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या अ‍ॅपच्या यादीत आहे.

टीकटॉकला टक्कर देण्यासाठी याआधी फेसबुकने देखील लास्सो अ‍ॅप लाँच केले होते. याशिवाय इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटने देखील टीकटॉकशी मिळते जुळते फीचर युजर्ससाठी आणले आहे.

Leave a Comment