लॉकडाऊन दरम्यान गणिताच्या शिक्षकांनी अशी केली विद्यार्थीनीची मदत

कोरोना व्हायरसमुळे देशभरातील अनेक शहर लॉकडाऊन आहेत. या स्थितीत शाळा, कॉलेज देखील बंद असून, विद्यार्थ्यांच्या परिक्षा देखील पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यातच सध्या एका गणिताच्या शिक्षकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरस होत आहे. हे शिक्षक सोशल डिस्टेंसिंग पाळत एका विद्यार्थीनीला गणित शिकवत आहेत.

जोश एंडरसन यांनी ट्विटर हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी हा शिक्षक आणि विद्यार्थीनीचा फोटो शेअर करत लिहिले की, 6वीच्या वर्गात शिकणाऱ्या माझ्या मुलीने ईमेलद्वारे तिच्या गणिताच्या शिक्षकांकडे मदत मागितली  व त्यांनी अशाप्रकारे मदत केली.

फोटोमध्ये दिसत आहे की, क्रिस वाबा हे गणिताचे शिक्षक बाहेर उभे राहून कार्डबोर्डच्या मदतीने 12 वर्षीय रेयली एंडरसनची मदत करत आहेत. सोशल डिस्टेंसिंग पाळत ते रेयलीला गणित शिकवत आहेत.

क्रिस केवळ गणिताचे शिक्षक नसून, ते रेयली यांच्या कॉलनीमध्येच राहतात. याशिवाय ते शाळेतील रेसलिंग कोच देखील आहेत. ते अशाच प्रकारे आपल्या भागातील विद्यार्थ्यांची मदत करत आहेत.

Leave a Comment