या देशाच्या राष्ट्रपतींचे लॉकडाऊन मोडणाऱ्यांना गोळ्या घालण्याचे आदेश

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक देश पावले उचलत आहेत. अनेक गोष्टींवर बंदी घातली जात आहे. मात्र या पार्श्वभुमीवर फिलीपाईन्सचे रोड्रीगो दुतेर्ते यांनी जे लॉकडाऊनचे पालन करत नाही, अशांना गोळ्या घालण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

राष्ट्रपती दुतर्ते यांनी प्रशासनाला थेट आदेश दिले आहेत की, जे कोणी लॉकडाऊनचे उल्लंघन करताना पकडले जाईल व कोणतीही समस्या निर्माण करेल, त्या व्यक्तीला त्वरित गोळ्या घालण्यात याव्यात.

दुतेर्ते यांनी सुरक्षा दलाला सांगितले आहे की, संपुर्ण देशासाठी ही एक चेतावणी आहे. सर्वांनी सरकारच्या आदेशाचे पालन करावे. कोणत्याही आरोग्य कर्मचारी. डॉक्टरला नुकसान पोहचवू नये. हा गंभीर गुन्हा समजला जाईल. त्यामुळे मी पोलीस आणि सुरक्षा दलाला आदेश देतो की, लॉकडाऊन दरम्यान समस्या निर्माण करणाऱ्याला गोळ्या घालाव्यात.

दरम्यान, राष्ट्रपती दुतेर्ते यांची देखील कोव्हिड-19 चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे समोर आले आहे. फिलीपाईन्समध्ये सध्या 2300 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 96 जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment