लॉकडाऊनच्या काळात वाढले गृहकलह

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या लॉकडाऊनचे विपरित परिणाम देखील आता समोर येऊ लागले आहेत. लॉकडाऊनमध्ये पती-पत्नींच्या भाडणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

छोट्या छोट्या गोष्टींवरून घरात भांडण सुरू आहेत. याबाबत पोलीस कंट्रोल रूमपर्यंत दररोज 30 पेक्षा अधिक प्रकरणं पोहचत आहेत. काही प्रकरणात तर स्वतः मुलांनी पालकांच्या भाडणांची माहिती पोलिसांना दिली आहे.

पोलीस कंट्रोल रुममध्ये 25 मार्च ते 1 एप्रिलपर्यंतचे आकडे पाहिले तर लक्षात येते की, दररोज 120 ते 140 फोन येत आहेत. यातील अधिकतर फोन हे घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी संदर्भात असतात. अनेकदा रात्रीचे वेळी पोलिसांना पाठवावे लागते.

रिपोर्टनुसार, लॉकडाऊनमुळे केवळ भारतच नाही तर ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि यूरोपियन देशांमध्ये देखील घरगुती हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाली आहे.  ऑस्ट्रेलियामध्ये अशा प्रकरणांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेत देखील स्थानिक प्रशासनाला याबाबत विशेष चेतावणी देण्यात आली आहे.

Leave a Comment