आयुष मंत्रालयाच्या या टिप्स वापरून वाढवा रोगप्रतिकारक शक्ती

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर आयुष मंत्रालयने सेल्फ केअर गाईडलाईन्स जारी केली आहे. सध्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाय सुचवणारी खोटी माहिती व्हायरल होत आहे. त्यामुळे आयुष मंत्रालयने सुचवलेले उपाय निरोगी राहण्यास व रोगप्रतिकारक शक्ती मदत होईल.

दैनंदिन जीवनात कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा हे आयुष मंत्रालयाने सांगितले आहे.यानुसार, दिवसभर गरम पाणी प्यावे.योगासन, प्राणायाम आणि ध्यान दररोज 30 मिनिटे नक्की करावे. हळद, जिरे, धणे, लसूणचा आहारात समावेश करा.

अशी वाढवा रोगप्रतिकारक शक्ती –

दिवसाची सुरूवात चवनप्राशने करा. ज्यांना मधुमेहाची समस्या आहे त्यांना साखर नसलेल चवनप्राश घ्यावे. याशिवाय हर्बल टी अथवा काढा घ्यावा. यात तुळस, दालचीनी, काळी मिरी, आले आणि मनुके पाण्यात टाकून उकळून घ्यावे व ते गाळून पाणी प्यावे. असे तुम्ही दिवसातून 1 ते 2 वेळा करू शकता. जर काढा पिण्यास समस्या असल्यास यात गुळ अथवा लिंबूचा रस टाकू शकता.

तसेच, दुधात अर्धा चमचा हळद मिसून दिवसातून एकदा-दोनदा प्यावे. मात्र याच्या आधी अथवा नंतर त्वरित जेवण करू नये. निरोगी राहण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीचा देखील वापर करू शकता.

प्रतिमर्श नष्यः –

तिळाचे तेल, नारियळचे तेल अथवा तूप नाकाच्या टोकावर लावावे. असे दिवसातून दोनदा करावे. रात्री झोपण्याआधी आणि सकाळी अंघोळीनंतर असे करावे. यालाच प्रतिमर्श नष्यः म्हणतात.

कोरडा खोकला आणि घशावरील समस्येसाठी उपचार –

पुदीन्याची पाने आणि बीज पाण्यात उकळावे व त्या पाण्याची वाफ घ्यावी. जर तुम्हाला कफ आणि घशाचा त्रास असल्यास लवंग पावडर, मध आणि साखर मिसळू घ्यावे व दिवसातून 2-3 वेळा याचे सेवन करावे. हे उपाय सामान्य खोकला अथवा घश्याची समस्या असल्यावर करावे. यानंतर देखील लक्षण असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे उपाय रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व हवामान बदलाप्रमणे येणाऱ्या समस्येसाठी आहे. यांना कोव्हिड-19 चे उपचार समजू नये.

 

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment