तुर्कमेनिस्तानमध्ये करोनाचा उच्चार केला तरी तुरुंगवास


फोटो सौजन्य पत्रिका
जगात इंटरनेटवर आज सर्वाधिक सर्च केलेला शब्द करोना व्हायरस आहे आणि जगभरातील सर्व देशात करोना हाच एक चर्चेचा आणि काळजीचा विषय आहे. मात्र तुर्कमेनिस्तान मध्ये करोना हा शब्द नागरिकांनी नुसता उच्चारला तरी त्यांना शिक्षा केली जात असून काहीना तुरुंगात टाकले गेले आहे. येथे मास्क वापरण्यावर बंदी घातली गेली आहे. याचा परिणाम म्हणून मिडिया आणि सरकारी आरोग्य खाते सुद्धा करोना या शब्दाचा उच्चार अथवा उल्लेख करेनासे झाले आहेत. विशेष म्हणजे या देशात अजून एकाही करोना बाधित रुग्ण सापडलेला नाही.

या मध्य आशियाई देशाचे राष्ट्रपती गुरबंगुली बेअरडेमुकामेडोव यांची फादर प्रोटेक्टर अशी ओळख आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारने सार्वजनिक जागी सध्या वेशातील स्पेशल एजंट नेमले असून ते गर्दीत कुणी करोनाविषयी चर्चा करतात का किंवा हा शब्द उच्चारतात का यावर नजर ठेऊन आहेत. असा कुणी आढळला तर त्याला ताबडतोब शिक्षा केली जाते अथवा तुरुंगात रवानगी केली जाते.

अर्थात करोनाविषयी येथील सरकारला चिंता आहे त्यामुळे त्यांनी प्रतीबंधाचे उपाय योजले आहेत. स्टेशन वर लोकांचे तापमान चेक करणे सुरु केले असून आंदोलने, राजधानी बाहेरच्या भागात जमावबंदी असे आदेश काढले असल्याचे वृत्त इंडिपेन्डटने दिले आहे.

Leave a Comment