घरात मेकअप करून काम करा, नवऱ्याना त्रास देऊ नका


फोटो सौजन्य साक्षी
सोशल मिडियावर लॉकडाऊनचा प्रभाव कुठे, कसा पडत आहे याच्या जोरदार चर्चा सुरु असतानाचा मलेशियन सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाने जारी केलेली नवी नियमावली तेथील महिलाच्या रागाचा उद्रेक करणारी ठरली आहे. मलेशियात #WOMENPREVENT COVID 19 या नावाने एक कॅम्पेन सुरु केले गेले असून ते सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या कॅम्पेन मधून मलेशियातील महिलांना अजब गजब सल्ले दिले गेले आहेत.

त्यानुसार लॉकडाऊनच्या काळात महिलांना घरातून काम करावे लागते आहे तेव्हा त्यांनी घरून काम करताना सुद्धा मेकअप करून, चांगले कपडे घालण्यास हरकत नसल्याचे सांगितले गेले आहे मात्र त्याचबरोबर नवऱयांना त्रास देऊ नये असेही बजावले गेले आहे. महिलांनी घरात सुद्धा प्रोडक्टीव्ह आणि शांत राहावे यासाठी अनेक मार्गदर्शक तत्वे सुचविली गेली आहेत. तशी पोस्टर बनविली गेली आहेत. नवऱ्याकडून घरकामात काही चूक झाली तरी त्याला बोलू नये असेही नमूद केले गेले आहे.

या अजब सल्ल्यामुळे मलेशियन महिलांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मलेशियात महिला अत्याचार आणि छळ प्रकरणांची संख्या वाढते आहे. महिला हेल्पलाईनच्या आकडेवारीनुसार १८ मार्च पासून आत्तापर्यंत अश्या ५० तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे नवे कॅम्पेन आल्याने महिलांच्या रागाचा उद्रेक झाला आहे.

Leave a Comment