उत्तर कोरियाचा हुकूमशहा मानवी मृतदेहांचे खत बनवून घेत आहे भाज्यांचे पिक


एकीकडे जगभरातील बहुतांश देश कोरोना सारख्या जीवघेण्या व्हायरससोबत लढा देत आहे. पण उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याच्यावर अशाही परिस्थितीत मानवतेला काळीमा फासल्याचा आरोप केला जात आहे. किम जोंग उन याच्याबाबत उत्तर कोरियाच्या जेलमधून पळून गेलेल्या एका महिलेने एक धक्कादायक खुलासा केला आहे. मानवी मृतदेहांचा वापर किम जोंग उन खतांसारखा करत असल्याचे तिने म्हटले आहे.

यासंदर्भात डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियामध्ये अपराध्यांच्या तपासणीसाठी नेमलेल्या एका आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीसमोर जेलमधून पळालेली महिला किम इल सून हिने हा खुलासा केला. किम अल सून हिने मानवाधिकार समिती सांगितल्याप्रमाणे, उत्तर कोरियाचे शासक मानवी मृतदेहांचा वापर शेतात खतांसाठी करत आहेत. राजधानी प्योंगप्योंगच्या जवळ या सरकारने एक शेत तयार केले आहे.

हुकूमशहाच्या सुरक्षारक्षकांसाठी या शेतात भाज्या आणि अन्य गोष्टींची पिके घेतली जातात. याच शेतात राजकीय कैद्यांचे मृतदेह खते बनवण्यासाठी वापरले जातात. यातून शेतीचे पिकही चांगले येते असे तेथील सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे. हे सर्व हुकूमशहा किम जोंग उन याच्या सांगण्यावरुन केले जात असल्याचा आरोप किम इल सूनने केला आहे. यावरून लक्षात येते की उत्तर कोरियामध्ये मानवाधिकारांची खुलेआम पायमल्ली होत आहे.

Leave a Comment