आजपासून लागू होणार हे 6 नवीन आर्थिक बदल

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीसह 1 एप्रिल 2020 पासून अनेक क्षेत्रात नियमांमध्ये बदल होणार आहेत. सरकारने या नियमांच्या बदलांबाबत आधीच अधिसूचना जारी केली आहे. याशिवाय कर, बँकिंग आणि उद्योगासह अनेक क्षेत्रातील नियमांमध्ये आजपासून बदल होणार आहे.

नवीन आयकर स्लॅब –

बजेटमध्ये घोषणा करण्यात आल्यानुसार एप्रिलपासून नवीन आयकर स्लॅब लागू होईल. आता करदात्यांसमोर दोन नवीन पर्याय असतील. करदात्यांना हवे असल्यास कराच्या सर्व सवलतीसोडून कमी झालेले नवीन दर निवडू शकतात. जर त्यांना सवलतींचा लाभ घ्यायचा असेल तर सध्याचा पर्याय निवडावा लागेल. सरकारने बजेटमध्ये आयकर स्लॅबमध्ये कर दर कमी करून 5 टक्के, 10 टक्के, 15 टक्के, 20 टक्के, 25 टक्के आणि 30 टक्के केले आहे.

कंपन्यांना डीटीडीवर सवलत –

बजेटमध्ये कंपन्या आणि म्युच्यूअल फंड्स हाऊसद्वारे देण्यात येणाऱ्या लाभांशावरील 10 टक्के वितरण कर समाप्त करण्यात आला आहे.  आता हा कर लाभांश प्राप्त गुंतवणूकदाराला द्यावा लागेल, जो आयकर स्लॅबनुसार लागू होईल. जर तुम्ही म्युच्युअल फंडद्वारे लाभांश घेत असाल तर ते तुमचे उत्पन्न समजले जाईल व त्याच्यावर कर लागेल.

ईपीएफ, एनपीएसवर कर –

भरभक्कम पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफ आणि एनपीएसला कराच्या कक्षेत आणण्यात आले. जर नियुक्त करणाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ, एनपीएसमध्ये वर्षाला 7.5 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होत असल्यास ते कराच्या कक्षेत येते. ही व्यवस्था आयकर प्रणालीच्या नवीन व जुन्या दोन्हीमध्ये आहे.

स्टार्टअपला दिलासा –

बजेटमध्ये स्टार्टअपसाठी बनवण्यात आलेले एम्प्लॉई स्टॉक ऑनरशिप प्लॅन (ईसॉप) नियम 1 एप्रिलपासून लागू होतील. या अंतर्गत स्टार्टअपला 5 वर्षांनी कर भरावा लागेल. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शेअरमध्ये भागीदारी मिळेल. आतापर्यंत 200 सुरूवाती स्टार्टअपला ईसॉपचा लाभ मिळत होतो.

मोबाईल होणार महाग –

जीएसटी परिषदेने काही दिवसांपुर्वी मोबाईलवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होतील, त्यानंतर मोबाईलच्या किंमती देखील वाढतील. नवीन दरांमध्ये 20 हजार रुपयांचा मोबाईल 1,200 रुपयांनी महाग होईल.

10 बँकांचे विलीनीकरण –

10 बँकांचे विलीनीकरण देखील लागू झाले आहे. या 10 बँकांना मिळून 4 नवीन बँक तयार होतील. बडोदा यूपी बँक आता देशातील सर्वात मोठी ग्रामीण बँक बनली आहे. या विलीनीकरणानंतर ग्राहकांना पासबुक, चेकबूक इत्यादी बदलावे लागेल.

Leave a Comment