खुशखबर ! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत एवढ्या रुपयांची कपात

लॉकडाऊनच्या काळात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करत सरकारने नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आजपासून 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर दिल्लीमध्ये 61.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आधी या सिलेंडरची किंमत 805.50 रुपये होती, जी आता 744 रुपये झाली आहे.

कोलकत्तामध्ये याची किंमत कमी होऊन 744.50 रुपये, मुंबईत 714.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 761.50 रुपये झाली आहे.

याशिवाय कंपन्यांनी 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत देखील कमी केली आहे. दिल्लीत 19 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर 96 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आधी या सिलेंडरची किंमत 1,381.50 रुपये होती, जी आता 1,285.50 रुपये झाली आहे. कोलकतामध्ये 19 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत आता 1,348.50 रुपये, मुंबईमध्ये 1,234.50 रुपये आणि चेन्नईत1,402 रुपये झाली आहे.

दरम्यान, आता ग्राहकांना 15 दिवसांच्या अंतरानेच घरगुती गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे. या संदर्भात इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने निर्णय घेतला आहे.

Leave a Comment