जाणून घ्या 150 देशात पसरलेल्या तबलीगी जमातीच्या प्रमुखांविषयी

दिल्लीच्या निझामुद्दीन येथील तबलीगी जमातीच्या मरकजमध्ये उपस्थित असणाऱ्यांद्वारे कोरोना व्हायरस जगभरात पसरल्याने ही जमात निशाण्यावर आली आहे. पोलिसांनी देखील तबलीगी जमातीचे प्रमुख मौलाना साद व अन्य जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मौलाना साद हेच तबलीगी जमातीचे अमीर अर्थात प्रमुख आहेत.

तीन वर्षांपुर्वी देखील तबलीगी जमात चर्चेत आली होती. तीन वर्षांपुर्वी या जमातीमध्ये फाळणी झाली होती. यानंतर मौलाना साद यांनी जुन्या तबलीगी जमातीचे स्वतःला प्रमुख म्हणून घोषीत केले.

मौलाना साद यांचे पणजोबा मौलाना इलियास कांधलवी यांनी वर्ष 1927 मध्ये तबलीगी जमातची स्थापना केली होती. ते उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील कांधला येथील मूळचे होते, म्हणूनच ते आपल्या नावापुढे कांधलवी लावत असे. मौलाना साद हे मौलाना इलियासच्या चौथ्या पिढीतील आहेत. तसेच मौलाना साद यांचे आजोबा मौलाना यूसुफ होते, जे मौलाना इलियास यांचे पुत्र होते व मृत्यूनंतर ते प्रमुखे झाले.

मौलाना साद यांचा जन्म दिल्लीतच झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मौलाना मोहम्मद हारून आहे. मौलाना साद यांची सुरूवातीचे शिक्षण मदरसा कशफुल उलूम, हजरत निझामुद्दीन येथे झाले. त्यानंतर सहारनपूर येथे त्यांनी पुढील शिक्षण घेतले.

1995 मध्ये तबलीगी जमातीचे प्रमुख मौलाना इनामुल हसन यांच्या निधनानंतर मौलाना साद यांनी मरकज यांच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्विकारली. तेव्हापासून ते या पदावर कायम आहेत.

भारतावर इंग्रजांचे शासन असताना आर्य समाजाने मुस्लिम धर्म स्विकारलेल्या हिंदूंचा शुद्धीकरण करण्यास सुरूवात केली होती. यानंतर 1926-27 मध्ये मौलाना इलियास कांधलवी यांनी तबलीगी जमातची स्थापना केली होती. इलियास यांच्यानंतर त्यांचे पुत्र मौलाना युसूफ जमातीचे प्रमुख झाले. 1965 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर मौलाना इनामुल हसन हे जमातीचे प्रमुख झाले. त्यांच्या काळात जमातची प्रसार जगभरात झाला.

वर्ष 1995 मध्ये मौलाना इनामुल हसन यांच्या मृत्यूनंतर प्रमुख पदावरून वाद सुरू झाला. अखेर 10 सदस्यांची नेमणूक करण्यात आली व हेच जमातीचे काम पाहत असे. या समितीमधील सदस्यांच्या मृत्यूनंतर जागेवरून वाद झाले व मौलाना साद यांनी स्वतःला जमातची प्रमुख म्हणून घोषीत केले. यानंतर तबलीगी जमातीत दोन गट पडले व दुसऱ्या गटाने तुर्कमान गेटवर मस्जिद फैज-ए-इलाहीद्वारे जमातची काम सुरू केले. मात्र आजही तबलीगी जमातीशी जोडलेला मुस्लिम समूदाय निझामुद्दीन येथील मरकजला प्रमुख केंद्र समजतो.

Leave a Comment