ईएमआयला 3 महिन्यांसाठी स्थगिती ? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच सरकारने तीन महिने हफ्त्यांना (ईएमआय) देखील स्थगिती दिली आहे. मात्र याशिवाय नागरिकांमध्ये अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांविषयी जाणून घेऊया.

कोणत्या प्रकारच्या कर्जाच्या हफ्त्यावर स्थगिती ?

जर आपण बँकेतून गृह कर्ज, कार, दुचाकी कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा इतर कोणतेही किरकोळ कर्ज घेतले असेल तर आपण याचा लाभ घेऊ शकता. याशिवाय शेतीसाठी, ट्रॅक्टर किंवा इतर कृषी उपकरणे खरेदीसाठी कर्ज घेतलेले असल्यास देखील तीन महिन्यांची स्थगिती मिळेल.

कधीपर्यंत मिळणार स्थगिती ?

1 मार्च 2020 ते 31 मे 2020 पर्यंत भरल्या जाणाऱ्या हफ्त्यासाठी ही स्थगिती मिळेल.

हे हफ्ते पुन्हा भरावे लागणार नाहीत ?

कोणताही हफ्ता भरण्यासाठी स्थगिती मिळाली असून, यापासून सुटका मिळालेली नाही. या तीन महिन्यात कापले न गेलेले हफ्त्यांचा कालावधी आणखी पुढे तीन महिन्यांनी वाढले. समजा तुमचे 20 हफ्ते तर ते आता 23 हफ्ते होतील. कारण मधील तीन महिने तुम्ही हफ्ते भरलेले नाहीत.

मार्च महिन्यात हफ्ता भरला असल्यास ?

जर तुम्ही मार्च महिन्यात हफ्ता भरला असल्यास तो फेब्रुवारी महिन्याची मूळ रक्कम आण व्याज होते. मार्च महिन्याचा हफ्ता एप्रिलमध्ये दिला जाईल.

आपोआप हफ्ता स्थगित होईल ?

सार्वजनिक बँकांनी अशी व्यवस्था आधीच केली आहे. त्यांच्या सर्व खातेधारकांचे हफ्ते स्थगित होतील. मात्र ईसीएस, पीडीएसी आणि शेड्यूल्ड इंस्ट्रक्शन असणारे ग्राहक यात येण्याची शक्यता कमी आहे. कॉर्पोरेशन बँकांनी देखील ग्राहकांना एसएमएस पाठवला आहे. जर ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिग क्लिअरिंग सिस्टम आणि पोस्ट डेटेड चेक दिला असल्यास दिलेल्या तारखेलाच हफ्त्याची रक्कम कापली जाईल.

स्वतः स्थगित करण्यासाठी काय करावे ?

जर तुमच्या खात्यात पैसे असतील तर तुम्ही हफ्ते सुरळीत चालू ठेऊ शकता. जर हफ्त्यांचा कालावधी वाढला तर व्याज देखील वाढते. जर तुम्हाला हफ्ते स्थगित करायचे असतील तर बँकेच्या शाखेला तशी माहिती द्यावी.

बँक कर्मचारी अथवा कलेकश्न एजेंटने हफ्त्यासंदर्भात फोन केल्यास ?

जर तुम्हाला असा कोणताही फोन आल्यास त्यांना सांगा की तुम्हाला नियामक पॅकेजच अंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभाचा फायदा घ्यायचा आहे.

क्रेडिट कार्डच्या थकबाकीचे काय ?

ही सवलत क्रेडिट कार्डसाठी देखील आहे. क्रेडिट कार्डच्या बाबतीत कमीत कमी रक्कम भरणे आवश्यक असते व न भरल्यास क्रेडिट ब्यूरोला माहिती दिली जाते. या कालावधीमध्ये पॅनल इंटरेस्ट अथवा दंडात्मक व्याज आकारले जाणार नाही.

Leave a Comment