आता फोनवरच मिळणार मुदत आणि आरोग्य विमा

मुदत विमा अथवा आरोग्य विमा घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला केवळ फोनवर डॉक्टरांशी केलेल्या चर्चेच्या (टेलिमेडिकल) आधारावर ही सुविधा मिळेल. लॉकडाऊनच्या काळात पॉलिसी बाजारने ही खास सुविधा सुरू केली आहे. यासाठी तुम्हाला स्वतः उपस्थित राहून तपासणी करण्याची गरज नाही.

सर्वसाधारणपणे मुदत विमा घेण्यासाठी विमाधारकांची व्यापकरित्या आरोग्य तपासणी केली जाते.

पॉलिसी बाजार डॉट कॉमचे मुख्य व्यावसायिक अधिकारी (जीवन विमा) संतोष अग्रवाल यांनी सांगितले की, या सुविधेसाठी एचडीएफसी एर्गो हेल्थ इंश्योरेंस, रेलिगेअर, मॅक्स बुपा, एचडीएफसी लाईफ इंश्योरेंस, मॅक्स लाईफ इंश्योरेंस आणिऔर टाटा एआयए सारख्या अनेक कंपन्यांसोबत भागीदारी करण्यात आली आहे. या कंपन्या आता टेलिमेडिकल व्यवस्थेद्वारे आपला विमा उपलब्ध करतील.

त्यांनी सांगितले की, टेलिमेडिकल ही प्रक्रिया पुर्णपणे विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या नियमाच्या कक्षेत आहे. मात्र जर ग्राहक फोनवर चुकीची माहिती देत असतील आणि तपासणीत हे सिद्ध झाले तर कंपनीकडे दावा रद्द करण्याचा पुर्ण अधिकार असेल.

Leave a Comment