लॉकडाऊन : दूरसंचार कंपन्या देणार मोफत टॉकटाईम

लॉकडाऊनच्या ट्रायने दूरसंचार कंपन्यांना आपल्या प्रीपेड ग्राहकांच्या प्लॅनचा कालावधी वाढवण्यास सांगितले होते. त्यानंतर बीएसएनएल-एमटीएनएल, जिओ, व्होडोफोन-आयडिया आणि एअरटेलने आपल्या ग्राहकांच्या प्रीपडे प्लॅनचा कालावधी वाढवला आहे.

बीएसएनएल आणि एमटीएनएल –

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल आणि एमटीएनएलने आपल्या प्रीपेड ग्राहकांचा टॉकटाइम कालावधी 20 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. सोबतच 10 रुपये टॉकटाईम देण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

एअरटेल –

एअरटेलने देखील आपल्या 8 कोटी ग्राहकांना मोठी भेट देत, कालावधी 17 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. सोबतच 10 रुपये मोफत टॉकटाईम देण्याचा निर्णय घेतला आहे.

जिओ –

लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी जिओने आपल्या ग्राहकांचा कालावधी 17 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. याशिवाय मोफत 100 मिनिट कॉलिंगसाठी दिले आहेत. ग्राहकांना 100 एसएमएस देखील जिओने दिले आहेत.

व्होडोफोन-आयडिया –

व्होडा-आयडियाने देखील आपल्या 10 कोटी ग्राहकांचा कालावधी 17 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. कोट्यावधी ग्राहक विना रिचार्ज करता इनकमिंग कॉलचि सुविधा घेऊ शकतील. याशिवाय त्यांना 10 रुपये अतिरिक्त टॉकटाईम मोफत मिळेल.

Leave a Comment