लॉकडाऊनची फलनिष्पत्ती बेबी बूम मध्ये होणार?


फोटो सौजन्य फादरली
जगभरात अनेक देशात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनची परिणीती पुढील वर्षाच्या सुरवातीला प्रचंड प्रमाणावर नवी बाळे जन्माला येण्यात होईल म्हणजेच पुढील वर्षाच्या सुरवातीला बेबी बूम असेल असे एका संशोधनात लक्षात आले आहे. हार्ले थेरपी क्लिनिकलच्या प्रमुख डॉ. शेरी जॅकबसन यांनी हे संशोधन केले आहे. अर्थात ते ब्रिटनपुरते मर्यादित असले तरी लॉक डाऊन असलेल्या सर्व देशांसाठी ते लागू होईल असे त्यांचे म्हणणे आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशात सध्या लॉक डाऊन आहे. सरकारने नागरिकानी घराबाहेर पडू नये तसेच सोशल डीस्टन्सिंग पाळावे असे आवाहन केल्यामुळे नागरिक घरात बंद आहेत. या लॉकडाऊनमुळे करोनावर किती नियंत्रण आले हे यथावकाश समजेल पण यामुळे या वर्षाच्या अखेरीपासून बाळांच्या जन्मदरात वाढ होईल असे सांगितले जात आहे.

डॉ. शेरी यांच्या मते सर्वेक्षणात असे लक्षात आले की या काळात जोडपी घरात बंद आहेत. त्यांना मोकळा वेळ आहे. घरात राहून बोअर होत असल्याने तणाव दूर करण्यासाठी ही जोडपी शारीरिक संबंधाना प्राधान्य देत आहेत. त्यात लॉक डाऊन मुळे गर्भनिरोधक औषधे आणि कंडोम बनविण्याऱ्या कंपन्या बंद असल्याने या साधनांचा बाजारात तुटवडा आहे. यामुळे अनेक जोडपी त्यांची पिढी पुढे वाढविण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे बेबी बूम येण्याची शक्यता आहे. भारतातही हाच ट्रेंड दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment