पीएम केअर्स फंडासाठी हिराबेन मोदींचे २५ हजार


फोटो सौजन्य पत्रिका
करोना विरुध्दच्या लढाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या पंतप्रधान केअर्स फंडात पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन यांनीही हातभार लावला असून स्वतःच्या बचतीतील २५००० रुपये दिले आहेत. हिराबेन गुजराथ मध्ये त्यांच्या परिवारासह राहतात पण करोना विरुध्दच्या लढाईत त्या मुलगा नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ उभ्या राहिल्या आहेत. देशात करोना केसेसची संख्या वाढत चालली असताना पंतप्रधान मोदींनी देशभरात लॉक डाऊन करून या लढाईची सुरवात केली आहे.

सोमवारी हिराबेन यांनी त्यांची मदत पंतप्रधान केअर्स फंडात जमा केली. त्या टीव्हीवर मोदींच्या प्रयत्नांचे समर्थन करत आहेत. सोशल मिडियावर हिराबेन यांची प्रशंसा केली जात आहे. करोना पिडीतांच्या मदतीसाठी स्थापल्या गेलेल्या या फंडात उद्योग जगत, बॉलीवूड आणि सर्वसामान्य नागरिक आपापल्या ऐपतीप्रमाणे मदत देत आहेत. परदेशातूनही या फंडासाठी पैसे येत असल्याचे समजते. मोदींच्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आयएएस असोसिएशनने २१ लाख दिले आहेत.

मोदींनी ट्विटरवर आईने दिलेल्या देणगीबद्दल ‘ आई, तुझ्या आणि कोट्यवधी मातांच्या आशीर्वादाने करोना विरुद्ध लढत असलेल्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल स्टाफ, पोलीस, सुरक्षा कर्मचारी, सफाई कर्मचारी, मिडिया मधील अगणित लोकांना प्रेरणा मिळाली आहे आणि पुढे काम करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे’ असे नमूद केले आहे.

Leave a Comment